Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

लिंग - पुल्लिंग, स्रीलिंग, नपुसकलिंग कसे ओळखावे? शिष्यवृत्ती परीक्षा उपयुक्त टिप्स्...

नामाच्या स्वरुपावरुन एखादी व्यक्ती किंवा वस्तू ही स्री जातीची आहे की पुरुषजातीची आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही, हे ज्या शब्दावरुन कळते त्याला लिंग असे म्हणतात. 


 लिंग - पुल्लिंग, स्रीलिंग, नपुसकलिंग कसे ओळखावे?

अधोरेखित शब्दाला किंवा एखाद्या शब्दाला तो, ती, ते या अक्षराने प्रश्न विचारल्यास त्या शब्दाचे लिंग कोणते याचे उत्तर मिळते.

तो म्हणजे पुल्लिंग
ती म्हणजे स्रीलिंग
ते म्हणजे नपुसकलिंग

उदाहरण

वही - स्रीलिंग.   ती वही
पुस्तक - नपुसकलिंग. ते पुस्तक
पेन - पुल्लिंग. तो पेन


शिष्यवृत्ती परीक्षा नमूना सराव प्रश्नपत्रिका व घटकनिहाय ऑनलाईन प्रश्नपत्रिका डाउनलोड / सोडविण्यासाठी  येथे टच करा. Download Model Question Paper


लिंग निश्चित करताना पुढील दोन बाबी लक्षात ठेवा.

1) ज्या शब्दाचे लिंग विचारले आहे तो शब्द जर अनेकवचनी असेल तर त्याचे अगोदर एकवचन करुन नंतरच तो, ती, ते वापरुन लिंग निश्चित करावे.
उदा- पुस्तके याचे स्रीलिंग न लिहिता एकवचन पुस्तक असे करुन लिंग नपुसकलिंग निश्चित करावे.

2) अधोरेखित शब्द आदरयुक्त असतील तर तात्पुरता आदर काढून लिंग निश्चित करावे.

उदा - बाबांनी मला खावू आणला.
यामध्ये ते बाबा असे म्हटले तर नपुसकलिंग येते परंतू बाबा या शब्दाचे लिंग पुल्लिंग येते. यामध्ये तात्पुरता आदर काढून ते बाबा ऐवजी तो बाबा असे म्हणावे.

मराठी व्याकरण - लिंग या घटका वरील ऑनलाईन टेस्ट सोडवा. Click Here

मराठी सर्व घटका वरील Online Test सोडवा. Click Here.

Post a Comment

0 Comments

close