दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे. Notes / Tricks पहा. .. तसेच PDF डाउनलोड करा.
दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. जर या दोन पद्धतीचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर या घटकावरील एकही प्रश्न चुकणार नाही. दिलेल्या अंकापासून लहानात लहान संख्या कशी तयार करतात पाहुया.
दररोजच्या नवीन अपडेटसाठी WhatsApp ग्रुपला सामील व्हा.
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका pdf, ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here....
नमुना पहिला - ( अंकामध्ये ० नसताना ) दिलेल्या अंकात शून्य नसताना लहानात लहान संख्या तयार करणे...
नमुना पहिला - अ ) लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. नंतर राहिलेले अंक चढत्या क्रमाने घेणे.
३, ४, ८, १ या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे. - उत्तर - १३४८
३, ८, २, ६ या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे. - उत्तर - २३६८
७, २, ९, ४ या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे. - उत्तर - २४७९
नमुना पहिला - ब ) दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. नंतर राहिलेले अंक चढत्या क्रमाने घेणे. त्यानंतर दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी संख्या तयार करताना कमी पडणारा अंक हा सर्वात लहान अंक सुरवातीस घ्यावा.
४, ८, १ या अंकापासून लहानात लहान चार अंकी संख्या तयार करणे. - उत्तर - ११४८
४, ८, १ या अंकापासून लहानात लहान पाच अंकी संख्या तयार करणे. - उत्तर - १११४८
४, ८, १ या अंकापासून लहानात लहान सहा अंकी संख्या तयार करणे. - उत्तर - ११११४८
नमुना दुसरा - ( अंकामध्ये ० असताना ) दिलेल्या अंकात शून्य असताना लहानात लहान संख्या तयार करणे...
नमुना दुसरा - अ ) लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. त्यानंतर शून्य घेऊन राहिलेले अंक चढत्या क्रमाने घेणे.
9, 0, 8, 6 या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे. उत्तर - 6089
4, 8, 2, 0, 5 या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे. उत्तर - 20458
5, 0, 3, 7 या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे. उत्तर - 3057
नमुना दुसरा - ब ) दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी लहानात लहान संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. नंतर राहिलेले अंक चढत्या क्रमाने घेणे. त्यानंतर दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी संख्या तयार करताना कमी पडणारा अंक म्हणून 0 हा अंक पहिल्या अंकानंतर लिहावा.
0, 3, 7 या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे.
तीन अंकी - 307
चार अंकी - 3007
पाच अंकी - 30007
6, 0, 9, 8 या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करणे.
चार अंकी - 6089
पाच अंकी - 60089
सहा अंकी - 600089
लहानात लहान संख्या तयार करणे उपयुक्त टिप्स्
*पाच अंकी* - सुरुवातीला सर्वात लहान अंक घेणे. जर शून्य सुरुवातीला घेतला तर तीन अंकी संख्या होते. त्यामुळे चार अंकी संख्या बनविण्यासाठी शून्य सोडून दुसरा लहान अंक घ्यावा. नंतर शून्य घ्यावे व नंतर पुढील अंक चढत्या क्रमाणे घ्यावेत. *पाच अंकी संख्या बनविण्यासाठी लहान अंक दोनदा घ्यावा.*
*उत्तर - ६००८९*
दिलेल्या अंकापासून लहानात लहान / मोठ्यात मोठी संख्या तयार करणे - Online Test सोडवा.
लहानात लहान संख्या तयार करणे नमूना उदाहरणे...
उदाहरण 1) शून्य नसताना
2, 9, 5, 8 या अंकापासून लहानात लहान संख्या तयार करा.
चार अंकी - 2589
पाच अंकी - 22589
सहा अंकी - 222589
उदाहरण 2) शून्य असताना
0 Comments