Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 अंतिम उत्तरसूची जाहीर.

रविवार दि. ३१ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक ( इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम उत्तरसूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. 


शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 अंतिम उत्तरसूची 

अंतिम उत्तरसूची इ. 5वी

सर्व माध्यम उत्तरसूची - Click Here


अंतिम उत्तरसूची इ. 8वी 

सर्व माध्यम उत्तरसूची - Click Here

मागील वर्षाच्या 2022 ते 2017 च्या प्रश्नपत्रिका तसेच इतर नमूना प्रश्नपत्रिका व अभ्यासक्रम स्वरुप डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. Click Here



अंतरिम (तात्परती) उत्तरसूचीवरील आक्षेप नोंदविण्याची कार्यपध्दती :

१) सदर अंतरिम उत्तरसूचीवर काही आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन स्वरूपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन पालकांकरीता संकेतस्थळावर व शाळांकरीता त्यांच्या लॉगीनमध्ये Objection on Question Paper & Interim Answer Key या हेडिंगखाली उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.. 

३) त्रुटी / आक्षेपाबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दिनांक 18/०८/२०२2 ते 28/०8/२०२2 रोजीपर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दि. 28/०8/२०२2 नंतर त्रुटी / आक्षेपाबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही.

अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची वरील आक्षेप नोंदविण्यासाठी येथे टच करा.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनांशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल समक्ष अथवा ईमेलव्दारे) प्राप्त त्रुटी आक्षेपाबाबतच्या निवेदनांचा विचार केला जाणार नाही. 

६) उपरोक्तनुसार विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही. 

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची वरील आक्षेप नोंदविण्यासाठी येथे टच करा. 


ऑनलाईन आवेदनपत्र व शाळा माहिती प्रपत्रातील माहितीत दुरुस्ती करणेकरीताची कार्यपध्दती : 

१) विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रातील माहितीत व शाळा माहिती प्रपत्रात विद्यार्थ्यांचे नाव, आडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, लिंग, शहरी / ग्रामीण इत्यादी) दुरुस्ती करण्यासाठी दिनांक 18/०८/२०२2 ते 28/०8/२०२2 रोजीपर्यंत शाळांच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांच्या माहितीत बदल करण्यासाठी लिंक - Click Here

(२) सदर अर्ज ऑनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पध्दतीने पाढविल्यास स्वीकारत्ने जाणार नाहीत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.

Post a Comment

0 Comments

close