Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बुद्धिमत्ता वर्गीकरण या घटकावरील प्रश्न कसे सोडवावेत? वापरा ही ट्रिक उत्तर 100% बरोबरच येणार

शिष्यवृत्ती परीक्षा बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण - शब्द, संख्या,आकृत्या या घटकावरील प्रश्न सोडविण्यासाठी एक सोपी ट्रिक पहा. ज्याने वर्गीकरण या घटकावरील एकही प्रश्न चुकणार नाही. 

वर्गीकरण - संख्या या घटकावरील प्रश्न सोडविताना विद्यार्थी दिलेल्या चार पर्यायातून एक वेगळा पर्याय निवडण्याचा प्रयत्न करतात अशावेळी उत्तर शंभर टक्के बरोबरच येईल याची खात्री देता येत नाही. 

उदाहरण समजावून घेऊया

वेगळा पर्याय ओळखा. 

49   45   90   24

या पर्यायातून वेगळा पर्याय निवडत असताना विद्यार्थी 90 हा पर्याय निवडण्याची शक्यता असते. कारण इतर तीन पर्यायात चार हा अंक समान आहे परंतु असे केल्याने उत्तर चुकलेले असण्याची शक्यता असते. येथे 90 हा पर्याय चूक आहे. 

वर्गीकरण शब्द, संख्या, आकृत्या या घटकावरील प्रश्न शंभर टक्के बरोबर येण्यासाठी खाली ट्रिक चा वापर करा. 

वर्गीकरण या घटकावरील प्रश्न सोडवण्यासाठी प्रथम चारही पर्याय वाचून घ्यावेत. या चार पर्यायातून तीन पर्याय असलेला एक गट शोधा. वेगळा पर्याय निवडण्यापेक्षा तीन संख्यांचा / शब्दांचा / आकृत्यांचा एक गट निवडल्यास वेगळा पर्याय आपोआप निघतो. त्यामुळे उत्तर 100% अचूक निघते. 

वरील उदाहरणांमध्ये दुसरा तिसरा आणि चौथा पर्याय या संख्येला तीन ने भाग जातो म्हणजे हे पर्याय तीन ने विभाज्य असणारे पर्याय आहेत तर पहिला पर्याय हा तीन विभाज्य नाही म्हणून पहिला पर्याय इथे बरोबर आहे. 

संख्यांचे गट कोणकोणते असू शकतात? 

Add your own points

वर्गीकरण -संख्या या घटकावरील टेस्ट सोडवा. Click Here

शब्दांचे गट कोणकोणते असू शकतात? 


Post a Comment

0 Comments

close