Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी उतारा व त्यावर आधारित प्रश्न भाग ३ text

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडव.


     आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल, त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे 'वक्तशीरपणा ' होय. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यांमुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे. त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही. वेळेत कामे पार पाडली नाहीत,तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे, तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो. म्हणून आपल्या कामांचे नियोजन करून ती वेळच्या वेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा.हाच वक्तशीरपणा होय. वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेणे होय.


खालील प्रश्न सोडवा. 

(१) 'वक्तशीरपणा' या मूल्याशी पुढीलपैकी कोणती गोष्ट योग्य नाही ?

 

१) वेळेचे नियोजन करणे

२) कामाची आखणी करणे

३) हाती घेतलेले काम वेळेत संपवणे

४) सर्व कामे वेगाने करणे.


(२) 'पार पाडणे' या वाक्प्रचाराचा उताऱ्यात आलेला योग्य अर्थ ओळखा.


१) नष्ट करणे

२) पूर्ण करणे

३) मेहनत करणे

४) खूप प्रयत्न करणे

हे ही वाचा.

आणखी उतारे व त्यावर आधारित प्रश्न / Video पाहण्यासाठी येथे टच करा.

(३) वक्तशीरपणा हे मूल्य आपल्या अंगी न रुजल्यास.............

१) फक्त दुसऱ्याचेच नुकसान होईल.

२) स्वत:चे नुकसान होणार नाही.

३) दोघांचाही फायदा होईल.

४) स्वत: चे हाताने स्वत:चे नुकसान केल्यासारखे होईल.


शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी संबंधित सर्व डाटा जसे घटक निहाय Online Test, Video, PDF, Notes and tricks, तसेच नमूना प्रश्नपत्रिका साठी येथे टच करा.

Post a Comment

0 Comments

close