एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द.. वाक्यातील शब्दांचा अर्थ कसा ओळखावा ? उपयुक्त टिप्स
भाषेमध्ये दिलेल्या शब्दाला एकाच अर्थाचे अनेक समानार्थी शब्द असतात. तसेच एकाच शब्दाचे संदर्भावरून भिन्न असणारे अनेक शब्द आहेत. हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्या वाक्याच्या अर्थावरून, संदर्भावरून त्या शब्दाचा अर्थ लावावा लागतो.
• उदा. - कर - हात, सारा, क्रिया करणे, किरण
1) त्याने दोन्ही करांनी नमस्कार केला.
या वाक्यात 'कर' म्हणजे हात असा अर्थ होतो.
• 2) बाबांनी ग्रामपंचायत कार्यालयात कर भरला.
या वाक्यात 'कर' म्हणजे सारा असा अर्थ होतो.
• 3) तू नियमित अभ्यास कर.
या वाक्यात क्रिया करणे (एक क्रियापद) असा अर्थ होतो.
• 4) सूर्य आपल्या सहस्त्र करानी आसमंत उजळतो.
या वाक्यात 'कर' शब्दाचा अर्थ 'किरणे' असा होतो.
कर या एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असे..
• पहिल्या वाक्यात 'कर' म्हणजे हात असा अर्थ होतो.
• दुसऱ्या वाक्यात सरकारकडे जमा करावयाचा पैसा असा अर्थ होतो.
• तिसऱ्या वाक्यात क्रिया करणे (एक क्रियापद) असा अर्थ होतो.
• चौथ्या वाक्यात 'कर' शब्दाचा अर्थ 'किरणे' असा होतो.
• अशा एकाच शब्दाला असणाऱ्या भिन्न अर्थामुळे भाषेचे सोंदर्य वाढले. लेखनशैली सुधारते.
0 Comments