Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NMMS Selection list / Merit list 2024 | NMMS परीक्षा निवड यादी / गुणवत्ता यादी 2023-24 | विद्यार्थी निहाय गुणवत्ता यादी डाउनलोड करा.

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2023-24 इ.8वी साठी परीक्षा दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या परीक्षेची गुणवत्ता यादी / निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. Download NMMS Selection list / Merit list 2024

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच pdf - Click Here

सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सेस भारत सरकार नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/ ( वार्षिक रु. १२,०००/-) आहे.

इ. ८ वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. १,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.

NMMS Exam नमूना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सन 2015 ते 2024 पर्यंत

NMMS परीक्षा 2024 गुणवत्ता यादी / विद्यार्थी निवड यादी डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

NMMS परीक्षा 2024 गुणवत्ता यादी / विद्यार्थी निवड यादी प्रवर्ग निहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

NMMS परीक्षा 2024 गुणवत्ता यादी / विद्यार्थी निवड यादी जिल्हानिहाय डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


NMMS Selection list School Login

NMMS परीक्षा 2024 गुणवत्ता यादी / विद्यार्थी निवड यादी Udise/ शाळानिहाय डाउनलोड करण्यासाठी (school login) येथे टच करा.


NMMS Exam Result 2024 | विद्यार्थी निहाय गुण यादी 2024


दिनांक २४ डिसेंबर, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या NMMS परीक्षसाठी २६६३५२ विद्यार्थी नोंदविण्यात आले होते. NMMS परीक्षेसाठी महाराष्ट्र राज्यासाठी ११६८२ शिष्यवृत्ती कोटा शिक्षण मंत्रालय (MoE), नवी दिल्ली यांचेकडून निश्चित केलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या आरक्षणानुसार संबंधित संवर्गातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. तसेच संबंधित संवर्गात दिव्यांगांसाठी ४% आरक्षण समाविष्ट आहे. सर्व जिल्हयांसाठी स्वतंत्रपणे इ. ७ वी व ८ वी ची विद्यार्थी संख्या व १२ ते १४ वयोगटातील संख्येच्या आधारे जिल्हयानिहाय कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. सदरची निवडयादी व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व

https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर शुक्रवार, दिनांक १२.०४.२०२४ रोजी पासून पाहता येईल. 

 सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध करुन दिली जाते. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घ्यावयाचा आहे.

➤ शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचेमार्फत केले जाते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

NMMS Exam 2024 ची अंतिम उत्तरसूची डाउनलोड करा. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक २४ डिसेंबर २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक ०७/०२/२०२४ रोजी पासून पाहता येईल.

विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलींग/जात/दिव्यांगत्व / जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास सदर बाबत दिनांक ०७/०२/२०२४ पर्यंत परिषदेकडे nmms.msce@gmail.com या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी. सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जांचा / दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांंची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.


Post a Comment

0 Comments

close