पुढील कविता वाचून त्याखालील विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सोडव.
दुध-भाकरी , मजेत खातो
भू:भू: करूनी पहारा करतो
खुशाल झोपा आम्हास सांगतो
शेताचीही राखण करतो||
धन्यापरी करी खरी माया
सेवा करण्या तत्पर काया
खाल्ल्या घरच्या भाकरीला जागतो
इमानी सदा जाग्रत असतो||
(१) वरील कवितेत कोणत्या प्राण्याबद्दलचे वर्णन आले आहे ?
१) बैल
२) घोडा
३) गाय
४) कुत्रा
(२) ' खाल्ल्या घरच्या भाकरीला जागणे ' या अर्थाची योग्य म्हण कोणती ?
१) खाल्ल्या घरचे वासे मोजणे.
२) जशी देणावळ , तशी धुणावळ.
३) खाई त्याला खवखवे.
४) ज्याची खावी पोळी ,त्याची वाजवावी टाळी.
(३) कवितेत वर्णन आलेल्या प्राण्याचा पुढीलपैकी कोणता गुण कवितेत आलेला नाही ?
१) सेवाभावी वृत्ती
२) कार्यतत्परता
३) स्वच्छंदीपणा
४) इमानदारपणा
0 Comments