Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मराठी उतारा व त्यावरील प्रश्न text भाग १

पुढील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे सोडव.

  एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला.त्यासाठी पराकोटीचे परिश्रम घेतले. त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले;पण तो थकला नाही; थांबला नाही. त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे . अखेरीस साडेअकराशे प्रयोगानंतर त्याला यश आले. एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती, म्हणून तो यशस्वी झाला. इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते. आपण हे लक्षात घेतले पाहिजे-'जो चालतो त्याचे भाग्यही चालते;जो थांबतो तो संपतो', ' धावत्याला शक्ती येई आणि रस्ता सापडे! 'या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की,माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे.अपयशाने खचून न जाता पुढे-पुढे जात राहिले पाहिजे.


प्रश्न

(१) एडिसन अपयश आल्यानंतर...............

१) थकून जायचा

२)आराम करायचा

३) पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा

४) अपयशाने खचून जायचा.


(२) एडिसनचा सर्वोत महत्वाचा गुण कोणता ?


१) तीव्र इच्छाशक्ती

२) आरामदायी वृत्ती

३)श्रद्धा व ईश्वरभक्ती

४)ताकद व सामर्थ्य.


(३) वरील उताऱ्यास पुढीलपैकी योग्य शीर्षक कोणते ?


१) वाचाल तर वाचाल

२) जनसेवा हीच ईश्वर सेवा

३) असेल माझा हरी | तर देईल खाटल्यावरी |

४) इच्छा असेल, तर मार्ग दिसेल.


हे ही वाचा.

आणखी उतारे व त्यावर आधारित प्रश्न / Video पाहण्यासाठी येथे टच करा.


शिष्यवृत्ती परीक्षा विषय मराठी संबंधित सर्व डाटा जसे घटक निहाय Online Test, Video, PDF, Notes and tricks, तसेच नमूना प्रश्नपत्रिका साठी येथे टच करा.

Post a Comment

0 Comments

close