Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आलंकारिक शब्द 100 ... PDF डाउनलोड करा.

मराठी भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की ज्याच्यामुळे भाषेला साज चढतो. अशा शब्दांना 'आलंकारिक शब्द' म्हणतात. आलंकारिक शब्द मराठी भाषेतील रंजकता वाढवतात. आलंकारिक शब्द 100 वाचा. PDF डाउनलोड करा. 


 1) अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस

 2) अकलेचा कांदा - मूर्ख

३) अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य

आलंकारिक शब्द या घटकावरील Online Test सोडवा - Click Here

४) अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार

५ ) अष्टपैलू  : सर्वगुणसंपन्न, अनेक चांगले गुण असलेला

६) अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट, गुपित

७) अक्षरशत्रू : निरक्षर माणूस, लिहिता वाचता न येणारा

८) अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे

९) अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार

१०) ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात, प्रारंभ

शिष्यवृत्ती परीक्षा - घटकनिहाय संंपूर्ण माहिती व सोशियल साईट्स

विषय घटकनिहाय Online Test घटकनिहाय Video घटकनिहाय PDF घटकनिहाय Notes/Tricks
मराठी Click Here Click Here Click Here Click Here
गणित Click Here Click Here Click Here Click Here
इंग्रजी Click Here Click Here Click Here Click Here
बुद्धिमत्ता Click Here Click Here Click Here Click Here
Join with us WhatsApp Telegram You Tube Facebook


११) उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा

१२) उंबराचे फुल : दुर्मिळ वस्तू

१३) कर्णाचा अवतार : उदार माणूस

१४) काडी पहिलवान : हडकुळा

१५) कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा, कळ लावणारा

१६) कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा

१७) कुंभकर्ण : झोपाळू माणूस

१८) कुपमंडूक : संकुचित वृत्तीचा

१९) कैकयी/मंथरा : दुष्ट स्त्री

२०) कोल्हेकुई : लोकांची वटवट 

२१) खडाजंगी, खडास्टक : जोराचे भांडण

२२) खुशालचंद : चैनिखोर मनुष्य

२३) खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे

२४) गंगा यमुना : अश्रू

२४) गोकूळ : मुलाबाळांनी भरलेले घर 

२५) गप्पीदास : गप्पा मारणारा

२६) गंडांतर : भीतीदायक संकट

२७) गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 

२८) गाढव : बेअकली माणूस

२९) गुरुकिल्ली : मर्म, रहस्य

३०) गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा

३१) गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत

३२) गोगलगाय : गरीब, निरुपद्रवी मनुष्य

३३) घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा

३४) घोरपड : चिकाटी धरणारा

३५) चर्पट पंजिरी : निरर्थक बडबड, बाष्कळ बडबड

३६) चालता काळ : वैभवाचा काळ

३७) चौदावे रत्न : मार

३८) छत्तीसचा आकडा : शत्रुत्व

३९) जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस

४०) टोळभैरव : चांगल्या कामात नासाडी करणारे

४१) ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा, दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा

४२) थंडा फराळ : उपवास, 

४३) दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे

४४) दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे

४५) देवमाणूस : साधाभोळा माणूस

४६) धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा

४७) धोपट मार्ग : सरळ मार्ग, रुळलेला मार्ग, नेहमीचा मार्ग


४८) नवकोट नारायण : खूप श्रीमंत

४९) नंदीबैल : हो ला हो म्हणणारा

५०) पिकले पान : म्हातारा 

५१) पाताळयंत्री : कारस्थान करणारा

५२) पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू

५३) पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग

५४) बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती

५५) बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य

५६) बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन

५७) भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न

५८) भाकड कथा : बाष्कळ गोष्टी

५९) भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा

६०) मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू

७०) मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम

७१) मृगजळ : केवळ अभास

७२) मेषपात्र : बावळट

७३) रुपेरी बेडी : चाकरी

७४) लंबकर्ण : बेअकली / बेअकल

७५) वाटण्याच्या अक्षता : नकार

७६) वाहती गंगा : आलेली संधी

७७) शकुनी मामा : कपटी माणूस

७८) सिकंदर : भाग्यवान

७९) रामबाण औषध : अचूक गुणकारी 

८०) शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य

८१) श्रीगणेशा : प्रारंभ, सुरुवात

८२) सव्यसाचा : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य, उलटसुलट काम करणारा

८३) सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य 

८४) स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य

८५) सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम

८६) सूर्यवंशी : उशिरा उठणारा

८७) सोन्याचे दिवस : चांगले दिवस

८८) रामबाण औषध : अचूक गुणकारी  

89) बिनभाड्याचे घर : तुरुंग

90) पांढरा परिस : लबाड

91) पोपटपंची : अर्थ न कळता पाठांतर करणे


Post a Comment

0 Comments

close