Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द. शिष्यवृत्ती परीक्षा विषय - मराठी घटक - एकाच शब्दाचे भिन्न अर्थ

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. हा घटक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द वाचा व लक्षात ठेवा. 

मराठी मध्ये एकाच शब्दांचे वेगवेगळे अर्थ असणारे शब्द मराठी भाषेची रंजकता वाढवतात. हे शब्द ज्या वाक्यामध्ये वापरले जातात त्या वाक्यातून वेगळा अर्थ प्राप्त होत असतो. तो अर्थ ओळखण्यासाठी वाक्यात वापरलेल्या संदर्भाचा विचार करावा लागतो. 

उदा - 

1) माया खूप हुशार मुलगी आहे. 

2) आई आपल्या मुलांची खूप माया करते. 

वरील दोन्ही वाक्यातील संदर्भ लक्षात घेतला असता पहिल्या वाक्यात माया हे मुलीचे नाव म्हणून आलेले आहे. तर दुसऱ्या वाक्यात माया हा शब्द ममता, प्रेम या अर्थाने आलेला आहे. 

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणाऱ्या शब्दांची यादी पहा.. PDF डाउनलोड करा. 


• माया - ममता, मुलीचे नाव, कपडे शिवताना सोडलेली जागा


• ओढा - मनाचा कल, पाण्याचा प्रवाह


• अंक- मांडी, संख्या, नाटकाचा भाग


• डाव - कारस्थान, कपट, खेळी


• द्वीज - पक्षी, ब्राम्हण

एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द यावरील ऑनलाईन टेस्ट सोडवा. - Click Here

• वास - गंध, वस्ती


• वारी - पाणी, नियमित फेरी


• वाली - रक्षणकर्ता, एका वानराचे नाव


• सूत - धागा, सारथी


• वात - वारा, विकार, दिव्याची वात


• दल - सैन्य, पान

www.scholarshipexamstudy.com

• जलद - ढग, लवकर


• भेट - भेटणे, नजराणा


• मान - मोठेपणा, शरीराचा भाग

PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

• कळ - भांडणाचे कारण, वेदना, किल्ली


• दंड - शिक्षा, बाहू, काठी


• सुमन - पवित्र मन, फूल नाव


• हार - पराभव, फुलांची माळ


• वर - आशीर्वाद, वरची दिशा, लग्न ठरलेला पुरूष

www.scholarshipexamstudy.com

• पेय - पाणी, दूध


• नाद - छंद, आवाज


• पर - परका, पीस, माशाचा अवयव


• पात्र - भांडे, लायक, नदीचे पात्र, नाटकातील भूमिका

PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

• पूर- नगर, पाण्याचा पूर


• घट- लहान मडके, तोटा


• भाव किंमत, भावना


• कर- हात, सारा


• विभूती - महान पुरूष, अंगारा, भस्म, रक्षा


• घाट - डोंगरातील रस्ता, नदीच्या पायऱ्या

www.scholarshipexamstudy.com

• तीर- काठ, बाण,


• धड- शरीराचा भाग, अखंड स्पष्टपणे


• काळ - वेळ, मृत्यू,



• नमुना प्रश्न :

अधोरिखत शब्दाचा अचूक अर्थ, दिलेल्या पर्यायातून शोधा. 


(1) प्रतिपक्षाने हार मानताच विजयश्रीचा हार रमेशच्या गळ्यात पडला (2017) 

(1) माळ (2) पराभव (3) दागिना (4) ओझे


(2) मनी नाही भाव आणि देवा मला पाव'

 (1) दर (2) गर्व (3) भक्ती (4) किंमत


Post a Comment

0 Comments

close