Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जोडशब्द कसे ओळखावेत? मराठी जोडशब्द नोट्स वाचा. PDF डाउनलोड करा.

जोडशब्द कसे ओळखावेत? मराठी जोडशब्द नोट्स वाचा. PDF डाउनलोड करा.

‘जोडशब्द’ याचा अर्थ जोडीने येणारे शब्द. शब्दाचा अर्थ अधिक स्पष्ट व्हावा म्हणून काही शब्दांची पुनरावृत्ती केली जाते. त्यामुळे बोलणे-लिहिणे हे डौलदार, प्रभावी वाटते.

जोडशब्द अनेक प्रकारचे असतात.

1) एकाच शब्दाची पुनरावृत्ती असलेले जोडशब्द.
उदा. धडधड, हिरवेहिरवे, कणकण.

2) एक शब्द अर्थपूर्ण ब दुसरा निरर्थक असलेले जोडशब्द.
उदा. ओबडधोबड, आडवातिडवा, उधळमाधळ.

3) काहीवेळा पहिल्या शब्दाच्या अर्थाचाच शब्द जोडून येतो. .
उदा. कामधंदा, भांडणतंटा, गडकिल्ले, पोरेबाळे.

4) काहीवेळा पहिल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द जोडून येतो.
उदा. जमाखर्च, बरेवाईट, नफातोटा.

5) काहीवेळा पहिल्या शब्दाला जोडून येणारा शब्द वेगळाही असतो.
उदा. गडकिल्ले दाणापाणी धनदौलत  साधाभोळा
गडकोट दाणावैरण धनधान्य साधासुधा

6) काहीवेळा दुसऱ्या शब्दातील फक्त एखादे अक्षर बदलते.
उदा. उपासतपास, अचकटविटकट, टंगळमंगळ.

Post a Comment

0 Comments

close