शब्दांच्या जाती आठ असतात. वाक्यातील शब्दांच्या जाती कशा ओळखाव्यात? याविषयीची माहिती पाहूया,
शब्दांच्या आठ जाती असतात. पुर्वप्राथमिक शिष्यवृत्तीसाठी चार च जाती अभ्यासल्या जातात.
शब्दांच्या जाती-
- नाम,
- सर्वनाम,
- विशेषण,
- क्रियापद,
- क्रियाविशेषण अव्यय,
- शब्दयोगी अव्यय,
- उभान्वयी अव्यय,
- केवलप्रयोगी अव्यय,
१) शब्दांच्या जाती - नाम
एखाद्या वस्तू, पदार्थ, व्यक्ती, प्राणी .... यांच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात.
उदा - तानाजी, लाडू, दगड, भारत, हिमालय, सृष्टी....
२) शब्दांच्या जाती- सर्वनाम
नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.
उदा- हा,ही,हे, तो,ती,ते, मी, आपण, तु, तुम्ही, आम्ही, कोण, कोणाला....
३) शब्दांच्या जाती - विशेषण
नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात.
उदा-
हुशार राजू
गरम चपाती
हिरवीगार पाने
उंच मुलगा
तीन फुले
४) शब्दांच्या जाती - क्रियापद
वाक्याची क्रिया ज्या शब्दाने पुर्ण होते त्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात.
उदा-
समीर दररोज पुस्तक वाचतो.
मला आंबा खूप आवडतो.
वाघ जंगलातील गुहेत राहतो.
५) शब्दांच्या जाती - क्रियाविशेषण अव्यय
६) शब्दांच्या जाती - शब्दयोगी अव्यय
७) शब्दांच्या जाती - उभान्वयी अव्यय
८) शब्दांच्या जाती - केवलप्रयोगी अव्यय

0 Comments