दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. Notes / Tricks पहा. .. तसेच PDF डाउनलोड करा.
दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करण्याच्या दोन पद्धती आहेत. जर या दोन पद्धतीचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलात तर या घटकावरील एकही प्रश्न चुकणार नाही. दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करतात पाहुया.
नमुना पहिला - ( अंकामध्ये ० नसताना ) दिलेल्या अंकात शून्य नसताना मोठ्यात मोठी संख्या तयार करणे...
नमुना पहिला - अ ) मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेणे. नंतर राहिलेले अंक उतरत्या क्रमाने घेणे.
३, ४, ८, १ या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. - उत्तर - ८४३१
३, ८, २, ६ या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. - उत्तर - ८६३२
७, २, ९, ४ या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. - उत्तर - ९७४२
नमुना पहिला - ब ) दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेणे. नंतर राहिलेले अंक उतरत्या क्रमाने घेणे. त्यानंतर दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी संख्या तयार करताना कमी पडणारा अंक हा सर्वात मोठा असलेला अंक सुरवातीस घ्यावा.
४, ८, १ या अंकापासून मोठ्यात मोठी चार अंकी संख्या तयार करणे. - उत्तर - ८८४१
४, ८, १ या अंकापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करणे. - उत्तर - ८८८४१
४, ८, १ या अंकापासून मोठ्यात मोठी सहा अंकी संख्या तयार करणे. - उत्तर - ८८८८४१
नमुना दुसरा - ( अंकामध्ये ० असताना ) दिलेल्या अंकात शून्य असताना मोठ्यात मोठी संख्या तयार करणे...
नमुना दुसरा - अ ) मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेणे. त्यानंतर राहिलेले अंक उतरत्या क्रमाने घेणे.
9, 0, 6, 8 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. उत्तर - 9860
4, 8, 2, 0, 5 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. उत्तर - 85420
5, 0, 3, 7 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. उत्तर - 7530
नमुना दुसरा - ब ) दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करताना सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेणे. नंतर राहिलेले अंक उतरत्या क्रमाने घेणे. त्यानंतर दिलेल्या अंकापेक्षा जास्त अंकी संख्या तयार करताना कमी पडणारा अंक म्हणून सर्वात मोठा अंक पहिल्या अंकानंतर लिहावा.
0, 3, 7 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे.
तीन अंकी - 730
चार अंकी - 7730
पाच अंकी - 77730
6, 0, 9, 8 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करणे.
चार अंकी - 9860
पाच अंकी - 99860
सहा अंकी - 999860
मोठ्यात मोठी संख्या तयार करणे उपयुक्त टिप्स्
*पाच अंकी* - चार अंक दिलेले असताना सुरुवातीला सर्वात मोठा अंक घेणे. नंतर पुढील अंक उतरत्या क्रमाने घ्यावेत. *पाच अंकी संख्या बनविण्यासाठी मोठा अंक सुरुवातीस दोनदा घ्यावा.*
दिलेल्या अंकापासून लहानात लहान / मोठ्यात मोठी संख्या तयार करणे - Online Test सोडवा.
मोठ्यात मोठी संख्या तयार करणे नमूना उदाहरणे...
उदाहरण 1) शून्य नसताना
2, 9, 5, 8 या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा.
चार अंकी - 9852
पाच अंकी - 99852
सहा अंकी - 999852
उदाहरण 2) शून्य असताना
0 Comments