Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

NMMS Exam 2022 होणार 19 जून 2022 रोजी | परीक्षेचे वेळापत्रक पहा.

NMMS Exam 2022 Form राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२१-२२ ही 19 जून 2022 रोजी होणार आहे. त्यासाठी आवेदनपत्रे भरण्यास 6 एप्रिल पासून सुरुवात करणेबाबत परिपत्रक काढण्यात आली आहे. 

NMMS Exam 2022 Time Table 
NMMS Exam ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. या परीक्षेत यशस्वी होण्याऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 12,000 एवढी शिष्यवृत्ती सलग चार वर्षे म्हणजे 8वी ते 12 वी पर्यंत एकूण 48,000 रु मिळते. 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना या शिष्यवृत्तीचा निश्चितच फायदा होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत ही परीक्षा घेतली जाते. 

NMMS EXAM 2022 शाळा रजिस्ट्रेशन व ऑनलाईन अर्ज करिता खालील लिंक वर क्लिक करा. 

👇


NMMS Exam Question paper

NMMS Exam परीक्षेचा सराव करण्यासाठी प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा. 

NMMS Exam Model Question paper


NMMS Exam 2022 ही परीक्षा 19 जून 2022 ला होणार आहे. याबाबत चे परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. - 
               

NMMS Exam 2022 Time Table 
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची (NMMS) ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक १९ जानेवारी २०२२ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. उपरोक्त परिषदेच्या संकेतस्थळावरील सूचनांचा विचार करून शाळांनी खालील बाबी विचारात घ्याव्यात.

१. सदर परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन आवेदनपत्रे शाळेमार्फतच भरावयाची आहेत.

२. विद्यार्थ्याची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, मूळ प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती व आवश्यक परीक्षा शुल्क संकलन करणे, शालेय शिक्षण

३. शाळा संलग्नता शुल्क रु. २००/- प्रतिसंस्था, प्रति शैक्षणिक वर्ष तसेच परीक्षा शुल्क प्रति विद्यार्थी रु. १००/- रक्कमेचा भरणा सदर परीक्षेसाठी स्वतंत्रपणे ई-बँकिंग, क्रेडिट/डेबिट कार्ड इ. द्वारे ऑनलाईन पध्दतीने भरावे लागेल. (चलनाद्वारे ऑफलाईन शुल्क भरता येणार नाही.)

Post a Comment

0 Comments

close