एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द वाचा. PDF डाउनलोड करा.
भाषेमध्ये दिलेल्या शब्दाला एकाच अर्थाचे अनेक समानार्थी शब्द असतात. तसेच एकाच शब्दाचे संदर्भावरून भिन्न असणारे अनेक शब्द आहेत. हे शब्द जेव्हा वाक्यात येतात तेव्हा त्या वाक्याच्या अर्थावरून, संदर्भावरून त्या शब्दाचा अर्थ लावावा लागतो. अशा एकाच शब्दाला असणाऱ्या भिन्न अर्थामुळे भाषेचे सोंदर्य वाढले. लेखनशैली सुधारते.
उदा.
1) कळ - भांडणाची कळ, वेदना हे दोन अर्थ आहेत.
कळ या शब्दाचे वाक्यानुसार अर्थ बदलतात.
- राजूने मधू आणि संजूमध्ये कळ लावून दिली.
- दिनेशच्या पायात एक मोठा काटा टोचताच एक जोराची कळ त्याच्या मस्तकापर्यत गेली.
वाक्यातील एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे ओळखावे ? उपयुक्त टिप्स पहा.
2) कर - हात, सारा, किरण, क्रिया हे वेगवेगळे अर्थ आहेत.
कर या शब्दांचे वाक्यानुसार अर्थ पहा.
- त्याने दोन्ही करांनी नमस्कार केला.
- बाबांनी ग्रामपंचायत कार्यालयात कर भरला.
कर या एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असे..
• पहिल्या वाक्यात 'कर' म्हणजे हात असा अर्थ होतो.
• दुसऱ्या वाक्यात सरकारकडे जमा करावयाचा पैसा असा अर्थ होतो.
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द यावरील ऑनलाईन टेस्ट सोडवा. - Click Here
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द 100+
अनंत - अमर्यादित , परमेश्वर.
अंग - शरीर , बाजूने , कलाने.
आस - इच्छा , गाडीच्या दोन चाकांना जोडणारा कणा.
ऋण - कर्ज , उपकार , वजाबाकीचे चिन्ह.
एकाच शब्दाचे भिन्न अर्थ सराव टेस्ट. - Click Here
ओढा - पाण्याचा लहान प्रवाह , मनाचा कल.
कर्ण - कान , काटकोन त्रिकोणातील काटकोनासमोरील बाजू , महाभारतातील दानशूर योद्धा .
कर - हात , सरकारी सारा ( Tax )
कलम - लेखणी, रोपांचे कलम
कळ - वेदना , भांडणाचे कारण.
काळ - वेळ , यम , मृत्यू .
कोर - चंद्राची कोर , कोरण्याची क्रिया.
खोड - झाडाचा बुंधा , सवय.
गाणे - गीत , गाऊन दाखवणे
PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
घट - मडके, झीज
चक्र - चाक, एक शस्त्र
चिमणी - एक पक्षी, गिरणीचे धुराडे
जात - प्रकार, समाज.
जीवन - पाणी, आयुष्य
जोडा - जोडपे, बूट
चूक - लहान खिळा, दोष.
झाड - वृक्ष , झाडू मारण्याची क्रिया.
डाव - कारस्थान , कपट , खेळी .
तट - किनारा , किल्याची भिंत , गट
ताव - तापविणे, कागद
तळी - तळाला , तलाव .
तीर - बाण , नदीचा किनारा , पाण्यातील सूर .
दंड - हाताचा ( बाहू ) , शिक्षा , काठी .
धड - मानेखालचा शरीराचा भाग , अखंड , स्पष्टपणे
ध्यान - समाधी , चिंतन , भोळसट
नग - पर्वत, वस्तू
नाद - आवाज , छंद .
नाव - होडी , वस्तूचे किंवा व्यक्तीचे नाव .
पर - पीस , पंख , परका.
PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
पत्र - पान, चिठ्ठी
पक्ष - राजकीय संघटना , वादातील दोन बाजू , पंधरवडा.
पास - उत्तीर्ण, परवाना
पाटी - लिहिण्याची , भाजी ठेवण्याची
पाठ - शरीराचा एक भाग , पाठांतर
पात्र - नदीच्या प्रवाहाची रुंदी , भांडे , योग्य , नाटकातील कलाकार .
पान - विड्याचे , जेवणाचे , झाडाचे , वही-पुस्तकाचे .
पार - पलीकडे , झाडाच्या भोवताली बांधलेला कट्टा .
पूर - नगर , पाण्याचा पूर
बाल - बालक, केस
भाव - भक्ती , किंमत , दर , भावना
मान - सन्मान , मोठेपणा , शरीराचा एक भाग
माया - ममता , प्रेम , धन
माळ - फुलांचा हार , ओसाड जागा .
लता - वेल, मुलीचे नाव .
वर - आशीर्वाद , लग्न ठरलेला पुरुष , वरची दिशा.
वचन - भाषण, प्रतिज्ञा
वळण - वाकडा रस्ता, प्रवृत्ती
वाणी - उद्गार , व्यापारी .
वात - दिव्याची वात , वारा , शरीराचा विकार
वार - घाव, दिवस
वारी - यात्रा , नियमित फेरी .
वाली - रक्षणकर्ता , पुराणकथेतील एका वानरराजाचे नाव .
विभूती - थोर व्यक्ती , अंगारा.
PDF डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.
सर - शिक्षक , फटाक्यांचा सर , बाजूस सारणे .
साथ - रोगाची साथ , सोबत .
सुमन - फूल , पवित्र ( चांगले ) मनमन
हवा - वायू, वारा, पाहिजे असा
हार - पराभव , फुलांची माळ.
0 Comments