Ticker

6/recent/ticker-posts

कूटप्रश्न - रांगेतील स्थान संकल्पना स्पष्ट करणे व प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त टिप्स text

कूटप्रश्न - कुटप्रश्न - रांगेतील स्थान संकल्पना स्पष्ट करणे व प्रश्न सोडविण्यासाठी उपयुक्त टिप्स 

संकल्पना :
काही वेळा एखादी समस्या फार गुंतागुंतीची आहे, असे आपल्याला जाणवते. दैनंदिन व्यवहारातील साधी सरळ माहिती समजून घेणे , तिची उकल करणे आपल्याला कठीण जात नाही . पण माहीती गुंतागुंतीची असेल तर,तिची उकल करताना आपण गोंधळतो .अशा माहितीवर तर्क - विचार करून टप्प्याटप्प्याने तिची उकल करणे गरजेचे असते . या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या बुद्धीस कस लागतो , असे म्हणता येईल .

थोडक्यात , कूटप्रश्न म्हणजे गुंतागुंतीचे प्रश्न . 

यांमध्ये 
(१) रांगेतील स्थान
(२) दिशा
(३) दिनदर्शिका
(४) वेतन आकृती
(५) कोडे  ( चौरस, त्रिकोण,वर्तुळ इत्यादी आकृत्यांतील संख्या ) या पाच उपघटकांचा समावेश असतो.


कुटप्रश्न - रांगेतील स्थान


ओळख : 
या उपघटकामध्ये दोन प्रकारच्या रांगांवर प्रश्न विचारले जातात. 

पहिला प्रकार - एका आडव्या ओळीत उभे राहणाऱ्या व्यक्तींची रांग ( उदा.,एकमेकांचे हात धरून उभे असणाऱ्या व्यक्ती / फुलांची माळ / दोरी ) 

दुसरा प्रकार - एकामागोमाग उभे राहणाऱ्या व्यक्ततींची रांग ( रेल्वे तिकिटासाठी उभे असणाऱ्या व्यक्ती ). 


रांगेविषयक प्रश्नात रांगेतल्या एका टोकाकडून किंवा दोन्ही टोकाकडून व्यक्तीचे स्थान क्रमांक दिलेले असतात. या माहिती वरुन विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर विद्यार्थ्यांने काढायचे असते .

उपयुक्त टिप्स : 


(१) रांगेतील व्यक्तीचे स्थान दोन्ही बाजूकडून दिलेले असते ,तेव्हा रांगेतील एकूण व्यक्ती मोजताना ती व्यक्ती दोनदा मोजली जाणार नाही ,याची दक्षता घ्यावी .

(२) रांगेतील एका व्यक्तीचे स्थान एका बाजूकडून दिलेले असते आणि रांगेतील एकूण व्यक्तींची संख्या दिलेली असते , तेव्हा त्या व्यक्तीच्या स्थानापासून दुसऱ्या बाजूस शेवटच्या व्यक्तीच्या स्थानापर्यंत मोजावे.

(३) रांगेतील व्यक्ती मोजताना एखादी व्यक्ती दोन वेळेस मोजली जाणार नाही याची काळजी घ्या.




Post a Comment

0 Comments

close