Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

इ. 5वी व इ. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2021 जुलै मध्ये प्रस्तावित....

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२१ जुलैमध्ये घेण्याबाबत प्रस्तावित करण्यात आले आहे. 

त्यादृष्टीने प्राथमिक तयारी म्हणून शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातील गोपनीय साहित्यासाठी सुरक्षित ठिकाणाची निश्चिती करणेबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. 

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त वेबसाइट

www.scholarshipexamstudy.com

शिष्यवृत्ती परीक्षा - बुद्धिमत्ता Online Test
http://bit.ly/Scholarship-Exam-Intelligence

शिष्यवृत्ती परीक्षा - मराठी Online Test
http://bit.ly/Scholarship-Exam-Marathi

शिष्यवृत्ती परीक्षा - गणित Online Test
http://bit.ly/Scholarship-Exam-Mathematics

शिष्यवृत्ती परीक्षा - इंग्रजी Online Test
http://bit.ly/Scholarship-Exam-English

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२१ ही माहे जुलैमध्ये राज्यातील सर्व परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित आहे. यापूर्वीच गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्यामार्फत परीक्षा केंद्रांची निश्चिती करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. तसेच परीक्षा केंद्रसंचालक, उपकेंद्रसंचालक, पर्यवेक्षक व शिपाई नियुक्तीबाबत तसेच परीक्षेचे गोपनीय साहित्य ठेवण्याचे सुरक्षित ठिकाण निश्चित करणेबाबतच्या सूचना यापूर्वीच निर्गमित करण्यात आल्या आहेत.

आता परीक्षेचे गोपनीय साहित्य जिल्हास्तरावर पोहोच करण्यात येणार असून सदर साहित्याचे बॉक्स उतरवून घेण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अथवा आपल्या कार्यालयात मध्यवर्ती व सुरक्षित ठिकाणाची निश्चिती करण्याबाबतची कार्यवाही केली जात आहे. 

Post a Comment

1 Comments

close