Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिष्यवृत्ती परीक्षा मराठी - शुद्ध अशुद्ध शब्द कसे ओळखावेत? नियम वाच. सराव चाचणी सोडव.

शुद्ध व अशुद्ध शब्द

लक्षात ठेवा :

व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेल्या निर्दोष लेखनाला शुध्दलेखन म्हणतात . अर्थपूर्ण शुध्दलेखणासाठी अनुस्वार ,ऱ्हस्व- दीर्घ व जोडाक्षरे इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक आहे . त्यासाठी शुध्दलेखनाचे काही प्रमुख नियम अभ्यासू या. 

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी दररोज सोडवा Telegram App वर.. Read more


शुद्धलेखनाचे नियम

१) एखाद्या शब्दातील ज्या अक्षरांचा उच्चार स्पष्टपणे नाकातून होतो , त्या अक्षरांवर नेहमी अनुस्वार द्यावा .

उदा ., कांदा , भिंत , सुगंध , दिंडी , संबंध , धांदल इत्यादी .


२) एकाक्षरी शब्दातील ' इ ' व ' उ 'स्वर दीर्घ लिहावेत .

उदा ., मी , ती , तू , धू , जू इत्यादी


३) सामान्यपणे , कोणत्याही शब्दातील शेवटचा  ' इ ' व ' उ ' हे सर्व दीर्घ लिहावेत .

उदा ., कवी ,रवी , विद्यार्थी ,गुरु ,अणू ,पशू इत्यादी .

मात्र हे शब्द जोडशब्दांत प्रारंभी आले , तर त्यांतील शेवटचा  ' इ ' किंवा ' उ ' सर्वर ऱ्हस्व लिहावा .

उदा ., कविचरित्र ,विद्यार्थिभांडार .गुरुकृपा इत्यादी .

समानार्थी शब्द ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. - Click Here 

४) अकारान्त शब्दातील उपांत्य ( शेवटून दुसरे अक्षर ) ' इकार ' व ' उकार ' दीर्घ लिहावेत.

उदा ., वीट , मीठ , खीर ,दूध , तूप ,नवनीत ,जमीन  इत्यादी .


५) शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याच्यामागील ' इकार ' व 'उकार ' बहुधा ऱ्हस्व लिहावेत .

उदा ., गरिबी , पाहुणा ,किती ,दिवा , महिना , नमुना ,बहिणी , वकिली इत्यादी .

शिष्यवृत्ती परीक्षा नमूना प्रश्नपत्रिका डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा. 

शुद्ध व अशुध्द शब्द या घटकावर आधारित सराव चाचणी सोडव. 👇



Touch to Join WhatsApp

शुद्ध अशुद्ध शब्द Online Test 2 सोडविण्यासाठी येथे टच करा. 


Post a Comment

1 Comments

close